महाराष्ट्र शासन कृषी विभागात भरती सुरु आहे. कृषी व पदुम विभाग, मुंबई येथे रिक्त पदे भरती केली जाणार आहे. कृषी विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कृषी विभागाद्वारे या नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे येथील विभागात तुम्हाला कामाची संधी आहे.
व्यवस्थापकीय संचालक या पदासाठी रिक्त पदे आहेत. या नोकरासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्याआधीच अर्ज करावेत.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शेतकरी उत्पादक कंपनी कक्षाची राज्यस्तरावर अंबलबजावणी करण्यासाठी मदत करायची आहे. महाराष्ट्र राज्यातील छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी संघाचे कामकाज पाहावे लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज कृषी संचालक, आत्मा कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे अर्ज पाठवायचा आहे.
महाराष्ट्र कृषी विभागात नोकरी करायची असेल तर तुम्हाला शेतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शेतकरी संघाच्या समस्या समजून घेता येणे आवश्यक आहे. विविध गावातील शेतजमिनींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करता यायला हवे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य उपाय काढता यायला हवा.















Discussion about this post