जळगाव । तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील माजी सरपंच, भाजपचे माजी पदाधिकाऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला बांधलेल्या दोरीच्या सहायाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. प्रकाश लक्ष्मण पाटील (वय ४४) असं या पदाधिकाऱ्याचे नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काश पाटील हे घुमावल बुद्रूक येथील घरून शनिवारी सकाळी बाहेर पडले. परंतु, कामानिमित्त त्यांचे मोठे भाऊ रविकांत लक्ष्मण पाटील हे घुमावल खुर्द शिवारातील शेतात आले असताना त्यांना प्रकाश पाटील यांचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रकाश पाटील यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. सुरेश पाटील यांनी मृत घोषित केले.
डॉ. पाटील यांच्या माहितीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकाश पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाचे असलेले प्रकाश पाटील यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.















Discussion about this post