पुणे । पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भव्य अधिवेशन होत असून यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना माध्यमांमधील प्रतिक्रियांवरुन कार्यकर्त्यांचे कान टोचले.
“विरोधक किती लबाड आहेत बघा या योजनेला सभागृहात विरोध करतात आणि गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपल लावतात. फेक नरेटीव्ह तयार होतो पण आपले लोक उत्तर देत नाहीत. मी आज आदेश देतो. फुल बॅटिंग करा, आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच “फेक नरेटीव्ह ला थेट नरेटीव्हने उत्तर द्या, फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका. काही जण असे बोलतात की चार दिवस त्याला उत्तर द्यावे लागतात. आमचे लोक प्रतिनिधी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत नाही असं म्हणत वादग्रस्त विधाने टाळा,” असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, नेते आमदार या अधिवेशनाला उपस्थित होते.















Discussion about this post