Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकरी उत्पादक कंपनी सभासदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 16, 2023
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा
बातमी शेअर करा..!

जळगाव : शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी) यांच्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली, जि.रत्नागिरी येथे पाच दिवसीय निवासी विनाशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या प्रशिक्षणात शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांनी आदर्श व्यवस्थापन कसे करावे. शेतकरी उत्पादक कंपनींना वित्त पुरवठा वैज्ञानिक प्रतिपूर्ती, कंपनीचे वित्तीय नियोजन व व्यवस्थापन विकास आराखडा तयार करणे. कृषी माल निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनींना वाव, संधी व कार्यप्रणाली. शेतकरी उत्पादक कंपनींच्या माध्यमातून सभासदांना शाश्वत निविष्ठा पुरवठा. बाजाराची गतिशीलता समजवुन घेणे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाइन विक्री व्यवस्था. कृषी मालाचे विपणन, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मुल्यसाखळी तयार करणे. शेतकरी उत्पादक कंपनी सभासद विसंवाद, प्रशासन व लेखाकर्म. व्यवसायिक जोखीम व वित्तीय व्यवस्थापन. केंद्र व राज्य पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनीसाठी विविध योजना, शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम व्हावी, ती शाश्वत चालावी व त्यामध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभागासाठी सारथी संस्थेमार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी वरील उद्दीष्ट्यांच्या आधारे योजना कार्यान्वित केलेली आहे. यामध्ये शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयतज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण साहित्य, चहा, नाश्ता, भोजन, निवास, क्षेत्रीय भेट व प्रमाणपत्र इत्यादी बाबीचा समावेश आहे.

प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती ही मराठा, कुणबी, कुणबी-मराठा मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावी व शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद असावी. शेतकरी उत्पादक कंपनी सभासद हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. प्रशिक्षणासाठी पात्र लक्षित गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्यूसी) / नॉन क्रीमिलीयर गटातील असावी. अथवा सदर सभासद शेतक-यांचे मागील 3 वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबतसंबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. उत्पादक कंपनीची कंपनी कायदा 2023 नुसार Register of Company (RoC) कडे नोंदणी झालेली असावी. कंपनीच्या भागधारकांची संख्या 50 पेक्षा कमी नसावी. शेतकरी हा नाबार्ड किंवा इतर शासकीय योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा. एका कंपनीतील जास्तीत जास्त पाच व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज https://sarthi-maharashtragov.in/ व www.mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातुन प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थी निवड ही शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जांपैकी मुल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या राज्यातील फक्त प्रथम 192 शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातील संचालक / सभासद / मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन 2023-2024 मध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली, जि.रत्नागिरी येथे देण्यात येईल.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे निशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिंकेजेस, इक्विटी ग्रॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे. अवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेचा अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी घ्यावा असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती. अहिरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बेताल वक्तव्य भोवलं ; इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Next Post

१० वर्षीय मुलादेखत वडिलाने मारली विहिरीत उडी ; जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१० वर्षीय मुलादेखत वडिलाने मारली विहिरीत उडी ; जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

१० वर्षीय मुलादेखत वडिलाने मारली विहिरीत उडी ; जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page