मुंबई । प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली असून निकम यांची ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या विजय पालांडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढली आहे. त्यांनी स्वत:वर राजकीय पक्षाचा शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.
उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. त्यांनी स्वत:वर राजकीय शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यंना या प्रश्नांना तोंड द्यावा लागेल. किंवा मला जबरदस्तीने निवडणूक लढण्यास भाग पाडलं हे त्यांना सांगावं लागेल. कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल, असं आव्हान देतानाच नाही तर त्यांना त्यांच्यावर लागलेला भाजप किंवा संघाचा शिक्का पुसता येणं अशक्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
माफी मागा
कालपर्यंत तुम्ही भाजपच्या तिकीटावर लढत होता. भाजपचा शिक्का घेऊन फिरत होता. त्यामुळे आता मला माफ करा, असं निकम यांनी म्हटलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे















Discussion about this post