नंदुरबार :निती आयोगाने देशभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे नाव समोर आले आहे.त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या धुळे जिल्हा देखील गरिबी रेषेखाली असल्याचं आता समोर आले आहे.
नंदुरबारजिल्हा हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे. आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची देखील ओळख आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव हे रोजगाराच्या शोधात राज्याच्या इतर ठिकाणी आणि गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतर होत असतात. यातच दारिद्र रेषेखालील असलेल्या आदिवासी बांधवांची संख्या देखील लक्षणीय असून आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या या ठिकाणी मोठ्या समस्या असून येथील आदिवासी बांधवांच्या विकास हा खुंटलेला आहे.
नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या नीती आयोगाच्या सर्वेक्षण अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यात ३३.१७ टक्के नागरिक हे गरिबीचे जीवन जगत आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात लागून असलेल्या धुळे जिल्ह्याचा गरिबी निदर्शकांत दुसरा क्रमांक आला असून धुळे जिल्ह्यातील २१. ४४ टक्के नागरिक हे दारिद्र्य रेषेखालील असल्याचा नीती आयोगाचा अहवालात नमूद करण्यात आलेला आहे.















Discussion about this post