नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला. केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2018 साली घेतला होता. हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने बुधवारी नवे हमीभाव ठरवले आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारने कपाशीपासून ते धान या पिकापर्यंत एकूण 14 महत्त्वाच्या पिकांचा हमीभाव वाढवला आहे. धान या पीकाचे हमीभाव 2300 रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. हा भाव गेल्या वर्षांच्या तुलनेत 117 रुपयांनी जास्त आहे. 2013-14 मध्ये धान या पिकाचा हमीभाव 1310 रुपये प्रति क्विंटल होता.
आता ज्वारीचा एमएसपी 3371 रुपये, भात 2300 रुपये, बाजरी 3625 रुपये, नाचणी 4290 रुपये, मका 2225 रुपये, तूर 7550 रुपये, मूग 8682 रुपये, उडीद 7400 रुपये, भुईमूग 6783 रुपये, सूर्यफूल 7280 रुपये, ज्वारीचा भाव 7290 रुपये आहे. तीळ 9267 रुपये झाला आहे.















Discussion about this post