नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारबाबत मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आकड्यांमधून देशातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदी सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे मोठे आव्हान असणार आहे. तसेच मोदी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
या मुलाखतीत म्हटलं की, ‘भारतीय राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या एका चुकीमुळं सरकार पडू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नाराजी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आघाडी सरकारमधील खासदार भूमिका बदलू शकतात’.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, ‘लोकसभा निवडणुकीचा निकाल मोदी सरकारच्या विरोधात आला आहे. भाजप घृणा पसरवू शकते. द्वेष पसरवू शकते. भाजप त्याचा फायदा घेऊ शकते. पण या बाबींना देशातील जनतेने नकार दिला आहे’.















Discussion about this post