१० वी पास असणाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागाने स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कसा अर्ज करायचा ते जाणून
घ्या…
भरतीसाठी आवश्यक पात्रता –
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. याशिवाय, मोटार मॅकेनिझमचे काम उमेदवाराला आले पाहिजे. तसेच, कार चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा. नागरी स्वयंसेवक म्हणून ३ वर्षांचा अनुभव देखील असावा.
वयश्रेणी : अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचे वय यापेक्षा जास्त असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
पगार –
या भरती प्रक्रियेत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला चांगला पगार मिळेल. या पदांवर निवड झालेल्या पात्र उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रतिमहा पगार दिला जाईल.
असा करा अर्ज –
– अर्ज करण्यासाठी सर्वात आधी भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जा.
– होमपेजवर असलेल्या इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२४ लिंकवर क्लिक करा.
– याठिकाणी सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
– आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
– अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेले अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
– अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा.















Discussion about this post