नंदूरबार : देशसेवा बजावत असताना नंदूरबार जिल्ह्याचे सुपुत्र शहीद रमेश वसावे यांना झारखंडमध्ये वीरमरण आलं आहे. शहीद रमेश वसावे यांच्यावर आज शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदूरबारचे शहीद मेजर रमेश वसावे हे सीआरपीएफ दलात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची जम्मू येथून राजस्थानच्या अजमेरमध्ये बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा अजमीरहून झारखंडला बदली करण्यात आली.
रमेश वसावे हे सोमवारी रात्री नियुक्तीच्या ठिकाणी हजर होते. त्यावेळी त्यांना वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव अजमेर होऊन रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घोटाळीपाडा या मूळ गावी आणण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी त्यांना मानवंदना देऊन शासकीय इंतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
शहीद मेजर रमेश वसावे त्यांच्या पहिली ते दहावी शिक्षण शहादा तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये झालं. 2005 साली त्यांची सीआरपीएफ मध्ये निवड झाली होती. रमेश वसावे हे कुटुंबात मोठे असल्याने घरात वयोवृद्ध आई शेवंताबाई, लहान दोन भावंडे तीन बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती. रमेश वसावे यांना दोन मुले आहेत. रमेश वसावे यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत. रमेश वसावे यांच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.















Discussion about this post