तुम्हीही केंद्रीय नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरती प्रक्रिया राबविली जात असून या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.
थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून सांस्कृतिक मंत्रालयामध्ये 67 पदे भरली जातील.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
भरली जाणाऱ्या पदाचे नाव :
या भरती प्रक्रियेतून उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञांची पदे भरली जाणार आहेत. इतिहास, मानववंशशास्त्र, भूविज्ञान आणि पुरातत्व विभागात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
हेच नाही तर उमेदवारांकडे एक वर्षाचा कामाचा अनुभव असणेही तितकेच महत्वाचे आहे. या भरती प्रक्रियेसाठी 35 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 रुपये ते 1 लाख 77 हजार 500 रुपये मासिक पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. upsc.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी नक्कीच तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.















Discussion about this post