धुळे । मागील दोन तीन दिवसात धुळे जिल्ह्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सून लवकरच आता धुळ्यात दाखल होईल. त्यापूर्वी शेती मशागत कामांना वेग आला आहे. पेरणी करण्यापूर्वीची लगबग सुरु असताना शेतात काम करताना विद्युत तारांना स्पर्श होऊन विजेच्या जोरदार झटक्याने तरुण शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे घडली.
चंद्रकांत मिठाराम माळी (वय ४०) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रकांत माळी हे दररोज व्हॅनने येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला शहाद्यातील भाजीपाला बाजारामध्ये घेऊन जात सकाळी दहापर्यंत परत येत होते. दरम्यान सोमवारी शेती काम करत असताना वीज खांबाजवळ बैलजोडीसह माळी आले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात बैलजोडी जागीच ठार झाली. तर माळी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
चंद्रकांत माळी यांचा यावर्षी फेब्रुवारीत चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. संसाराला सुरवात झाली असतानाच चंद्रकांत माळी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर पत्नी, आई- वडील, भाऊ- बहीण यांनी एकच आक्रोश केला.















Discussion about this post