यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून लवकरच एनडीए सरकार स्थापन करणार आहे. मात्र सत्तास्थापनेआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निकालाला दिवशी शेअर मार्केट कोसळला होता. त्यावरून पंतप्रधानांनी ५ कोटी लोकांना स्टॉक खरेदी करण्याचा आदेश का दिला होता? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
४ जूनला निवडणुकीच्या निकालादिवशी शेअर मार्केट कोसळला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. देशातील ५ कोटी लोकस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. तरीही या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला का लावली? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
नरेंद्र मोदींनी दोन चॅनलला मुलाखती दिल्या. या प्रकरणात त्या चॅनलचा रोल काय आहे?. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात परदेशातील गुंतवणूक वाढली होती त्यामुळे त्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा संबंध काय आहे? या घोटाळ्याची जॉइंट पार्लमेंटरी कमिटीने (JPC) चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.















Discussion about this post