जळगाव । लोकसभा निवडणुकीचं रणमैदान सध्या चांगलचं पेटलं असून सगळीकडे राजकीय वातावरणही तापलं असून प्रचारसभानांही वेग आला आहे. याच दरम्यान, जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावच्या महायुतीच्या सभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी राजकीय नेत्यांमधलं लव्ह-हेट रिलेशनही उदाहरणासह समजावून सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सगळेच आय लव्ह यू म्हणतात, दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. पण विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, आय हेट यू म्हणतात, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावरून आता चर्चा रंगली आहे
जळगावच्या अंमळनेर येथील महायुतीच्या मेळाव्यात जाहीर भाषणात गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. ‘विधानसभेच्या निवडणुकीत सर्व एकमेकांच्या विरोधात असतात मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते..’ विधानसभेच्या निवडणुकीवेळी सर्वजण एकमेकांविरोधात उभे असतात. पण लोकसभेच्या निवडणुकीवेळी, खासदारकीच्या वेळी शत्रूदेखील एकमेकांचे मित्र होता. आजच्या मंचावरच बघा… अंमळनेर मध्ये शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांच्यात आय लव यू.., तिकडे पाचोरा तालुक्यात किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात आय लव यू.., धरणगाव मध्ये गुलाबराव पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात आय लव यू. आणि विधानसभा निवडणूक लागली की, आय हेट यू ? असं गुलाबराव पाटील म्हणाले. एरवी आमची तोंडं वाकडी असली तरी देशाचं नेतृत्व ठरवण्यासाठी आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र येऊन देशाचे नेतृत्व ठरवणार आहोत ही महत्त्वाची बाब आहे, असं ते म्हणाले.















Discussion about this post