पुणे : महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली असून यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नागरिकांना उन्हाची झळ बसू लागली आहे. राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यात पारा ४० अंशापुढे गेला आहे. यातच राज्यात पुढील तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत नागिरकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट असणार आहे. राज्यात शुक्रवारी (दि.३) सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगावात ४३.८ अंश सेल्सिअस झाली. तर सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १८.३ अंशावर नोंदले गेले. पुण्यात सरासरीहून कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात सरासरीहून अधिक २ अंशाने वाढ झाली
जळगावमध्ये तापमानाचा पारा वाढला असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. यात जळगावात देखील ७ मे पर्यंत तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील तापमान चाळिशीपार नोंदले गेले. अकोल्यात सर्वाधिक ४३.४, अमरावतीला ४२.६ तर नागपूरला ४०.५ अंशावर तापमान होते.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे रात्री नागरिकांना थंडावा मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात दोन-तीन दिवस यलो अलर्ट देण्यात















Discussion about this post