नवी दिल्ली । देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अशातच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलासा देण्याचा प्रयन्त केला आहे. सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली असून त्याचबरोबर १ मॅट्रिक टन कांद्यासाठी जवळास ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलं आहे.
गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त सोडलं होतं. मोदी सरकारला शेतकऱ्यांची अजिबात चिंता नसून हे फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचं सरकार होतं, असं म्हणत विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. दरम्यान, राज्यात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या या रोषाचा फटका भाजपला बसणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मॅट्रिक टन कांद्यासाठी ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलं आहे.















Discussion about this post