जळगाव । राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. हॉटसिटी भुसावळचे तापमान पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. गुरुवारी शहरात ४३.५ अंश कमाल, तर २६.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या २० एप्रिल नंतर तापमान प्रथमच ४३ अंशांच्या वर गेले. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवार पाठोपाठ जिल्ह्यात शुक्रवारी सुद्धा यलो अलर्ट दिला आहे. शुक्रवारी वादळी वारे, मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली होती, ३२ दिवसांच्या ब्रेकनंतर तापमान चाळिशीच्या आत आले होते. मात्र, यानंतर पुन्हा तापमान वाढायला सुरुवात झाली. गुरुवारी ते ४१.५ अंशांपर्यंत पोहोचले. यापूर्वी २० एप्रिल रोजी कमाल तापमान ४३.२ अंश होते. नंतर ते २१ला ४२.१ अंश, २२ एप्रिलला ३७.१, २३ला ४९.९, २४ला ४३ अंश आणि २५ एप्रिल रोजी ४२.५ अंशांपर्यंत पोहोचले. सकाळी १० वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढली.
हवामान बदलाचे कारण
वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर आहे. वातावरणाच्या खालील थरातील द्रोणिका रेखा मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातून चक्रिय स्थितीतून तामिळनाडूपर्यंत जात आहे. तसेच आणखी एक ब्रोणिका रेखा दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटकपर्यंत विदर्भ आणि मराठवाडयातून जात आहे. यामुळे मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.















Discussion about this post