मुंबई : गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी मोठी फूट पडली होती. अजित पवारांनी काही आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडलेल्या घडामोडींबाबत सर्वात मोठे गौप्यस्फोट केला आहे.
“माझे काही सहकारी हे अस्वस्थ होते. त्यांना एजन्सीजचा त्रास होईल, असं वाटत होतं. ते आमच्याशी बोलत होते. त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे वॉशिंगमशीन, कपडे टाकायचे आणि स्वच्छ करुन बाहेर निघतील, तशी संधी आपल्याला मिळेल, असं काही लोकांचं मत होतं”, असं शरद पवारांनी सांगितलं.“मला अंदाज आहे की, जी फाईल टेबलवर जाईल ती मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपाटात ठेवली जाईल. आता ती समजा नाही. उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधीही काढली जाईल. त्यामुळे आजचं मरण उद्यावर गेलं, असं वाटलं तर त्यात काही चुकीचं नाही.
“ते गेले, ते अनेक वर्ष पक्षाचे काम करत होते. आम्ही त्यांना अनेक पदं दिली. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही. पण काही लोकं होती. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर मी मला शक्य नाही, मला योग्य वाटत नाही, असं म्हटल्याच्या नंतर आम्ही हा निर्णय घेतला. मी त्यांना सांगत होतो की, मी हे करणार नाही आणि तुम्हीदेखील हे करणं योग्य नाही”, असं शरद पवार म्हणाले.















Discussion about this post