मुंबई । एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतातील हिंदू धर्म, जय भवानी हे शब्द काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अशी राज्यकर्ते आमच्यावर टीका करतात करतात. त्यांच्या हाताखाली आयोग काम करतो. हिंदू धर्म हा शब्द काढायला लावणं हे योग्य आहे का ? असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान सहन करणार नाही असे म्हणत आम्ही प्रचार गीतामधून जय भवानी हा शब्द काढणार नाही असेही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
एवढंच नव्हे तर पंतप्रधान मोदी, अमित शाह हे देवाच्या नावाने मत मागतात ते चालतं का ? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली.
निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून दोन शब्द काढायला लावले. “हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म” यामधील हिंदू धर्म शब्द काढायला लावला. तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेमधील ‘जय भवानी’ शब्द काढा,” असे निवडणूक आयोगाने सांगितल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही देखील रामभक्त आहोत हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचं दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारचं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे,” असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे सांगितले.















Discussion about this post