जळगाव । गेल्या सहा दिवसांपासून तापमान ४२ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हाचा हा तडाखा पुढील दोन दिवसांसाठी काहीप्रमाणात कमी होणार आहे. मात्र, आर्द्रता वाढल्याने रात्री दिलासा मिळणार नाही. उत्तर तसेच दक्षिण भारतात म्हणजेच तामिळनाडू, केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मिर या भागात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. हेच वातावरण आता महाराष्ट्राकडे सरकत असल्याने २१ व २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील.
तसेच तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी हवामान विभागाने गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु, तशी परिस्थिती तयार झाली नाही. दरम्यान, ढगाळ वातावरणाने नागरीकांना दोन दिवसांसाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. याच कालावधीत आर्द्रता वाढणार आहे. शनिवारी शहरात तापमान ४१.४ अंश राहिले. दीड ते दोन अंशांनी पारा घसरल्याने उष्णता कमी होती.
रात्रीचे तापमान २५ अंशांवर पुढील काही दिक्स रात्री उष्णता जाणवणार आहे. त्याचे कारण म्हणजे जिल्ह्यात किमान तापमानाचा आकडा वाढलेला आहे. रात्री २५ ते २६ अंश तापमान आहे. ते २१ अंशाच्या आत -आल्यानंतरच रात्री दिलासा मिळू शकतो















Discussion about this post