बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केरळ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने लिपिक आणि कार्यालयीन परिचरांसाठी भरती जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, लिपिक आणि ऑफिस अटेंडंटसाठी 479 रिक्त जागा आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या keralapsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
केरळ राज्य सहकारी बँकेत लिपिक (कॅशियर) च्या एकूण 230 जागा आहेत. ज्यामध्ये सर्वसाधारणसाठी 115 आणि सोसायटी प्रवर्गासाठी 115 आहेत. तर कार्यालयीन परिचराच्या २४९ जागा रिक्त आहेत. त्यापैकी 125 सर्वसाधारण आणि 124 सोसायटी प्रवर्गासाठी आहेत.
शैक्षणिक पात्रता
लिपिक- उमेदवारांनी वाणिज्य शाखेत पदवी किंवा कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले पाहिजे. याशिवाय कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी आणि सहकार पदविका असलेलेही अर्ज करू शकतात.
ऑफिस अटेंडंट- मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
लिपिक आणि परिचर या दोन्ही पदांसाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे आहे. तर राखीव प्रवर्गासाठी कमाल वय ५० वर्षे असावे.
केरळ बँकेत पगार
लिपिक – रु 20,280 – रु 54,720/-
ऑफिस अटेंडंट – रु 16,500 – 44,050/-















Discussion about this post