भंडारा । सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारांचा प्रचार, सभा जोरदार घेतल्या जात आहे. यातच भंडारा-गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी साकोली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रचार सभा झाली. यावेळी संबोधित करताना अमित शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीमागील कारण सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना, तर शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, असा थेट हल्ला करीत शिवसेना, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली नाही,’ अशा शब्दांत अमित शाह यांनी साकोली येथील सभेत ठाकरे-पवारांच्या हल्ला चढवला.
भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली हे समजून घ्यायला हवे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना हवे ते दिले असते तर शिवसेना फुटली नसती. राष्ट्रवादीच्या बाबतीत शरद पवारांचे मुलीवरील प्रेम हेच फुटीचे कारण आहे. अजित पवार यांना त्यांचे हक्क दिले असते तर फूट कधीच झाली नसती, असे शाह म्हणाले. आज अर्धी शिवसेना, अर्धी एनसीपी आणि त्यांनी बनवलेली अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी केला
राज्यघटना बदलणार नाही
पुढील ५ वर्षांत मोफत रेशन, तीन कोटी गरिबांना घरे देण्यात येणार आहेत. दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समृद्ध केले आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर कधीच राज्यघटना आणि आरक्षण बदलणार नाही. आरक्षणाला १० लावणार नाही, असेह> यांनी स्पष्ट केले















Discussion about this post