मुंबई : एकीकडे उन्हाचा पारा वाढल्याने उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे अंगाची काहीलाही होतं आहेत. यातच देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
पुढील 24 तासात या भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्या पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. पुढील 24 तासात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागाता पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने 16 एप्रिल आणि 17 एप्रिलला उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत मात्र हवामान कोरडं राहणार असून काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे.















Discussion about this post