मुंबई । सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून तेजीचे सत्र सुरु असून अशातच काल शुक्रवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोने रेकॉर्ड ब्रेक दरावर पोहोचले
काल सोन्याच्या भाव ६८ हजार ६०० रुपये प्रति तोळा होता. एक तोळा सोन्यासाठी ३ टक्के जीएसटीसह ७०,६५८ रुपये मोजावे लागले. चांदीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७५,५०० रुपये किलोवर पोहोचली.
सोन्याचा भाव का वाढतोय?
अमेरिकन बँकांची स्थिती खराब असल्यामुळे मार्चच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढू लागले आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचा भाव ६७ हजारांच्या टप्प्यावर पोहोचले. अमेरिकन बँकांची स्थिती सुधारत नसल्यामुळे व्याजदर आणखी कमी केल्याने मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात आहे. हे दरवाढीचे सत्र कायम राहिल्याने दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ७५ हजारांपर्यंत पोहोचू शकतो असे मत सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.















Discussion about this post