सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण ६१ जागा भरल्या जातील.
उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करावा लागेल. ictmumbai.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.
लक्ष्यात असू Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 तर भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी वेळेपूर्वी अर्ज करावा.
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
प्राध्यापक – (i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 13 वर्षे अनुभव
सहकारी प्राध्यापक- (i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी /पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
सहाय्यक प्राध्यापक- Ph.D.अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग : ₹500/-]
वयाची अट: 14 मार्च 2024 रोजी,
पद क्र.1: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत















Discussion about this post