मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यामुळे मित्र पक्ष असलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. अशातच आता भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचा समावेश आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.दरम्यान, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय.
कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता?
प्रीतम मुंडे, बीड
सुभाष भामरे, धुळे
सिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
संजय काका पाटील, सांगली
सुधाकर श्रृंगारे, लातूर
उन्मेश पाटील, जळगाव
गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई
पुनम महाजन, उत्तर मध्य मुंबई
प्रताप चिखलीकर, नांदेड
सुजय विखे पाटील, अहमदनगर
रामदास तडस, वर्धा
रक्षा खडसे, रावेर















Discussion about this post