जळगाव । महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघातर्फे लाक्षणिक संप पुकारला आल्यामुळे आज जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्या बंद राहणार आहे. आज सकाळपासूनच जळगाव येथील बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल परत न्यावा लागला आहे.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघातर्फे राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळत आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे, एरवी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची रेलचेल बघावयास मिळत असते. परंतु आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट बघावयास मिळत आहे.
शेतीमाल न आणण्याचे आवाहन राज्यव्यापी संप असल्याने शेतकरीवर्गाने शेतीमाल आणू नये; असे आवाहन धुळे बाजार समिती प्रशासनातर्फे दोन दिवसांपूर्वीच केले होते. शिवाय आजदेखील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज माळ विक्रीसाठी आणला होता. मात्र संप असल्याने माळ परत न्यावा लागला.















Discussion about this post