तुम्हीही नवीन Electric स्कुटर खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. बेंगळुरू येथील ईव्ही (EV) उत्पादक कंपनी बाऊन्स इन्फिनिटीही आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सूट जाहीर केली आहे.कंपनीने आपल्या Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 24,000 रुपयांनी कमी केली आहे.
या कपातीनंतर इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन एक्स-शोरूम किंमत 113,000 रुपयांवरून 89,999 रुपयांवर आली आहे. याच्या नवीन किमतीही तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. इन्फिनिटी E1+ इलेक्ट्रिक स्कूटरवरील ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत वैध असेल.
Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरला 2.2kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी 65 kmph चा टॉप स्पीड देते. स्कूटर 2kWh लिथियम-आयन NMC बॅटरी पॅकसह येते. जी एका चार्जवर 85 किमी पेक्षा जास्त IDC रेंज देते. E1+ इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन स्प्रिंग शॉक देण्यात आले आहेत.















Discussion about this post