नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मजबूत लढा देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. मात्र निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसलं. अशातच इंडिया आघाडीतील फुटीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सगळ्यात मोठं विधान केलं.
शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील वादविवादावर भाष्य केलंय. शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद आहेत. मात्र ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय, असं शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील 3 जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झाला नाही उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श बाबत एक श्वेतपत्र काढले आणि जे व्हायचं ते झालं, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर शरद पवारांनी भाष्य केलंय.















Discussion about this post