जळगाव । एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे, मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी अंडरपास बोगदा, अंडर ग्राऊंड बोगदा, तसेच समांतर रस्ते नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून नागरिकांचे बळी जात आहे.
तर दुसरीकडे या परिसरातील इतर गावातील ग्रामस्थांना अंडरपास बोगदा नसल्याने रस्ता पार करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, या मागण्यांसंदर्भात आज महामार्ग चौपदरीकरण कृती समीतीच्या वतीने जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली, तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवदेन दिले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यान असलेला राष्ट्रीय महामार्ग ओलांडून शेतात ये-जा करत असतात शिवाय शेतकऱ्यांसह मजूर यांना येण्या जाण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करावा लागतो, त्यामुळे दोन्ही बाजूने भरधाव वेगाने वाहने येतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अनेक वेळा भीषण अपघात होऊन तीन ते चार जणांचा बळी गेलेला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार उमेश पाटील यांनी बैठक घेऊन समांतर रस्ता आणि बोगद्या संदर्भात बैठक घेतली होती, परंतु अद्यापपर्यंत यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कासोदा फाटा, एरंडोल रस्त्यावरील पिंपरी फाटा, एरंडोल शहरातील महाजन नगर ते दत्त मंदिरपर्यंत समांतर रस्ता, पथदिवे तसेच एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यान समांतर रस्ता आणि बोगदे तयार करण्यात यावे, या मागणी केली आहे.
एरंडोल तालुक्यातील शेतकरी, स्थानिक व्यापारी आणि सर्वपक्षीय संघटनांचे नेते यांनी मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मागण्याची निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बी.एस. चौधरी, कैलास महाजन, गोरख चौधरी, पंकज महाजन, विजय महाजन, देविदास महाजन, दुर्गादास महाजन, डॉ.प्रवीण वाघ, अशोक चौधरी, नानाभाऊ महाजन, महेंद्रसिंग पाटील, अरुण माळी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.















Discussion about this post