जळगाव । अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने एक मोठी आणि कठोर कारवाई हाती घेतली आहे. जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेला तब्बल ९५८.०७० किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यातील तरतुदींनुसार सुरक्षितपणे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS) विविध कारवाया करून हा साठा जप्त केला होता. त्यामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांमधून ४३२.२४० किलो, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमधून २६२.४३० किलो, एरंडोल पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून १८२ किलो, जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून ५८ किलो आणि जामनेर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून २२ किलो असा एकूण ९५८.०७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता.
संबंधित गुन्ह्यांपैकी काही प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागला असून काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. मात्र, न्यायालयाची परवानगी आणि सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अमली पदार्थांचा नाश करण्यात येत आहे.















Discussion about this post