जळगाव । जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करत १७ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये २ पोलिस निरीक्षक (PI), ८ सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि ७ पोलिस उपनिरीक्षकांचा (PSI) समावेश आहे
या फेरबदलांत जिल्हा विशेष शाखेतील रिक्त पदावर कावेरी कमलाकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदीप ठाकूर यांच्याकडे जळगाव सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेले विशाल पाटील यांची सावदा पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेतील गणेश फड यांची सावदा पोलिस ठाण्यात, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील माधुरी बोरसे यांची मानव संसाधन विभागात, अहिल्यानगर येथील विजय माळी यांची भुसावळ शहर पोलिस ठाण्यात, फोर्स वनचे सुनील कदम यांची धरणगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भुसावळचे राहुल भंडारे यांच्याकडे शहर वाहतूक शाखेच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली असून रामानंद नगरचे नीलेश राजपूत यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पाचोरा येथील प्रमोद वाघ यांची अडावद पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
उपनिरीक्षकांच्या बदल्याही जाहीर
जिल्हा पोलीस दलातील उपनिरीक्षकांच्या बदल्यांमध्येही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील मो. अली सत्तार अली यांची भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात, तर भुसावळ बाजारपेठेतील भारती काळे यांची चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
डायल ११२ मध्ये कार्यरत दीपक जगदाळे यांची स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) बदली करण्यात आली असून एलसीबीतील कृष्णा पाटील यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. तसेच अहिल्यानगरचे निवांत जाधव यांची भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात, एमआयडीसीचे संतोष पवार यांची धरणगाव पोलिस ठाण्यात, तर डायल ११२ मधील सुनील पाटील यांची अँटी टेररिझम ब्युरो (एटीबी) येथे नियुक्ती करण्यात आली आहे.















Discussion about this post