Wednesday, October 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 14, 2026
in राष्ट्रीय
0
बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला
बातमी शेअर करा..!

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपुर येथे गंगा नदीत नाव उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत काही जण बेपत्ता असल्याची माहिती असून, बुधवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. मृतांमध्ये बहुतांश मुलांचे वय १५ वर्षांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील रामपूर श्यामचंद पंचायत अंतर्गत भगतान टोला परिसरात श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुमारे २० ते २५ जण एका छोट्या नावेतून नदीपलीकडे जात होते. नावेत मुले आणि ग्रामस्थ होते. मात्र, नदीच्या प्रवाहातून जात असताना अचानक नाव उलटली आणि त्यातील सर्वजण पाण्यात पडले.ही नाव सरकारी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नाव नेमकी कशामुळे उलटली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या दुर्घटनेमुळे कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१३ मुलांचा मृत्यू; तिघांना रुग्णालयात हलवले

नाव बुडाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेल्या काही जणांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर १७ मुलांना राघोपुर फतेहपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर १३ मुलांना मृत घोषित केले. गंभीर अवस्थेतील तीन मुलांना पुढील उपचारांसाठी पाटणा येथील पीएमसीएच रुग्णालयात पाठवण्यात आले, तर एका मुलाची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे.

मृतांमध्ये १५ वर्षांच्या आसपासच्या मुलांचा समावेश

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या मुलांमध्ये मीरा कुमारी, निशु कुमारी, अनिषा कुमारी, सुनीता कुमारी, आर्यन कुमार, मोहन कुमार, अमृता कुमारी, अंकिता कुमारी, पिंकी कुमारी, नमन कुमार, सिकी कुमारी, भोनू कुमारी आणि सोनम कुमारी यांचा समावेश आहे.एकाच गावातील मुलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांना गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू

दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने बुधवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. नदीतील प्रवाह आणि दुर्घटनेचे स्वरूप लक्षात घेता शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नाव उलटण्यामागील नेमके कारण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कॉकरोच जनता पार्टीच्या तीन नेत्यांची तुरुंगात रवानगी; अभिजीत दिपकेंचा मोदींना थेट इशारा

Next Post

बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा! जळगावसह राज्यात हवामानाचा डबल गेम

October 14, 2026
बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील सासू-जावयाचा जागीच मृत्यू

October 14, 2026
बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

बिहारमध्ये गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू; श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला

October 14, 2026
अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासची सुटका ; CJP ची पुढील भूमिका काय?

कॉकरोच जनता पार्टीच्या तीन नेत्यांची तुरुंगात रवानगी; अभिजीत दिपकेंचा मोदींना थेट इशारा

October 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page