Thursday, June 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“लोकशाहीची थट्टा थांबवा!” भाजप उमेदवाराच्या वर्तणुकीला कंटाळून चाळीसगावच्या १३ नगरसेवकांचा मतदानाला ‘नकार’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 18, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
“लोकशाहीची थट्टा थांबवा!” भाजप उमेदवाराच्या वर्तणुकीला कंटाळून चाळीसगावच्या १३ नगरसेवकांचा मतदानाला ‘नकार’
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर चाळीसगावमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर येत आहे. चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख यांच्या ‘शहर विकास आघाडी’चे ११ नगरसेवक आणि २ अपक्ष नगरसेवक अशा एकूण १३ नगरसेवकांनी या निवडणुकीतील मतदानावर थेट बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव येथे दुपारी २ वाजता स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या ‘राजगड’ या निवासस्थानी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत चाळीसगाव शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी पक्षाची आणि सर्व नगरसेवकांची भूमिका मांडली. यावेळी चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व ११ नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आणि दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी एकत्रितपणे जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले.बहिष्काराच्या या टोकाच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अपक्ष नगरसेविका सौ. सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी भाजप उमेदवारावर थेट आणि गंभीर आरोप केले. ते म्हणाले,भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मतदारांकडे साधा फोन करून किंवा प्रत्यक्ष येऊन मत मागण्यासाठीही आलेला नाही. जो उमेदवार मत मागायलाही तयार नाही, अशा उमेदवाराला आम्ही मत तरी कसे द्यावे? हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न आहे.

पुढे बोलताना त्यांनी इतर अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवरही तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक थेट भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची आणि लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याच कारणांमुळे आम्ही या निवडणुकीच्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय समीकरणे बदलणार?
निवडणुकीच्या अगदी तोंडावर चाळीसगावमधील १३ नगरसेवकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानावर टाकलेल्या या बहिष्कारामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आता कोणते नवीन वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; यावल तालुक्यातील घटना

Next Post

पोलीस सिक्युरिटी बाजूला ठेवा, पहिल्यांदा गिरीश महाजनांनाच फोडणार; संजय राऊतांचा दिल्लीतून थेट इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गिरीश महाजनांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती ठेकेदारांना दिली; संजय राऊतांची टीका 

पोलीस सिक्युरिटी बाजूला ठेवा, पहिल्यांदा गिरीश महाजनांनाच फोडणार; संजय राऊतांचा दिल्लीतून थेट इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या! तरी भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण

June 18, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: जिल्ह्यात ९७.७८ टक्के विक्रमी मतदान

जळगाव विधान परिषद निवडणूक: जिल्ह्यात ९७.७८ टक्के विक्रमी मतदान

June 18, 2026
गिरीश महाजनांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती ठेकेदारांना दिली; संजय राऊतांची टीका 

पोलीस सिक्युरिटी बाजूला ठेवा, पहिल्यांदा गिरीश महाजनांनाच फोडणार; संजय राऊतांचा दिल्लीतून थेट इशारा

June 18, 2026
“लोकशाहीची थट्टा थांबवा!” भाजप उमेदवाराच्या वर्तणुकीला कंटाळून चाळीसगावच्या १३ नगरसेवकांचा मतदानाला ‘नकार’

“लोकशाहीची थट्टा थांबवा!” भाजप उमेदवाराच्या वर्तणुकीला कंटाळून चाळीसगावच्या १३ नगरसेवकांचा मतदानाला ‘नकार’

June 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page