पारोळा । अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा शहरानजीक घडली. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून तपस सुरु आहे.
पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे चौफुलीजवळ सांगवी येथील रहिवासी संदीप ऊर्फ आबा शालीग्राम पाटील (वय ३६) हे सांगवीकडून दुचाकीने पारोळ्याकडे येत होते. पारोळा शहर काही अनंतराव असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. याबाबत घटनेची माहिती ज्ञानेश्वर रामोशी यांनी फोनद्वारे दिल्याने घटनास्थळी सांगवी येथील प्रवीण पाटील, भास्कर देवरे, नथ्थू पाटील व ग्रामस्थ दाखल झाले. यावेळी जखमी अवस्थेतील संदीप पाटील यास उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले.
संदीप पाटील यास रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहचल्यानांत डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेबाबत पारोळा पोलिसात जामसिंग पाटील (रा. सांगवी) फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नाना पवार तपास करीत आहे.















Discussion about this post