मुंबई । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज, शनिवार ८ मार्च रोजी सोने स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आणि होळीच्या आधी सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी सोन्याने 1360 रुपयांची झेप घेतली. त्यानंतर सलग दोन दिवसांपासून किंमतीत घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात सतत वाढ होत असून, गेल्या आठवड्यात 5 हजार रुपयांनी स्वस्त झालेली चांदी आता पुन्हा महाग झाली आहे.
आजच्या घसरणीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,१५० रुपयांच्या आसपास आहे आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ७९,८०० रुपयांच्या वर आहे. एक किलो चांदीची किंमत ९९,२०० रुपयांच्या पातळीवर आहे.
सोन्याचा भाव का घसरला?
सोन्याच्या किमती घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांची सावधगिरी आणि जागतिक आर्थिक धोरणांमध्ये होणारे संभाव्य बदल. विशेषतः, अमेरिकेच्या कर धोरणांमध्ये आणि रोजगार दर आणि बेरोजगारी दर यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक डेटामध्ये संभाव्य बदल बाजारात अस्थिरता निर्माण करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत होत आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी होत आहे आणि किंमतींमध्ये घसरण होत आहे.
Discussion about this post