महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजाववरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चांगेलच आक्रमक झाले होते. त्रिभाषा सक्तीवरून कडाडून विरोध झाल्यांनतर अखेर राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा निर्णय माघे घेतला. यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. ‘मराठीचा आवाज’ असं या मेळाव्याला नाव देण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये राज्यातील कानाकोऱ्यातून मराठी सैनिक आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २००५ नंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.
सुरूवातीला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित जनतेला संबोधित केलं. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेला संबोधित करत थेट युतीचे संकेत दिले आहेत. ‘एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी’ असे विधान करताच उपस्थितांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा केली. दरम्यान, आजचे उद्धव ठाकरेंचे ६ गाजलेले मुद्दे कोणते? पाहुयात.
उद्धव ठाकरेंचे ६ गाजलेले मुद्दे
१. आज आमच्या भाषणांपेक्षा दोघांचं एकत्र दिसणं गरजेचं. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केलाय. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी..
२. भाजप ही खरंतर अफवांची फॅक्टरी आहे. मागील काळात त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलंय असं उठवलं. खरंतर हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे, तुमच्याहून जास्त कडवट कट्टर आहोत. मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर, आम्ही गुंड आहोत.
३. मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती होती आणि याचा मला अभिमान आहे. यानंतर काहीजण कोर्टात गेले, ही गुंडगिरी नाही? तो भेडिया का कोण? ही त्यांची पिलावळ आहेत. ते म्हणतात शिवसेनेनं आजवर काय केलं? मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेलं. मराठी माणूस जर मुंबईबाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही मुंबई अन् महाराष्ट्राचे लचके तोडले, त्याचं काय? उद्योग, व्यवसाय पळवले त्याचं काय?
४. आपली ताकद ही एकजुटीची असायला हवी. संकट आले की आपण सगळे एकत्र येतो. संकट गेल्यावर आपापसात भांडायला लागतो. असा नतद्रष्टपणा आता करायचा नाही.
५. वृत्तपत्रात बातमी वाचली की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद झालं आहे. नव्यानं नोंदणी होणार नाही, आता बसा बोंबलत. त्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे, संपूर्ण भारतात कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या जास्त महाराष्ट्रात आहे.
६. एक गद्दार काल म्हणाला, जय गुजरात.. किती लाचारी करायची? पुष्पामध्ये नायक म्हणतो, झुकेगा नही साला, तसे हे गद्दार म्हणातात, उठेगा नही साला. आता त्यांच्यात उठण्यासारखं आहेच काय?















Discussion about this post