केंद्रीय लोक सेवा आयोग(UPSC)ने भरती जाहीर केली आहे. केंद्रिय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर upsconline.gov.in जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसांत तुम्हाला अर्ज करायचा आहे.
या भरती मोहिमेत ३५७ पदे रिक्त आहेत. त्यातील बीएसएफमध्ये २४ रिक्त पदे आहेत. आयटीबीपीमध्ये ४ पदे, एसएसबीमध्ये ३३ पदे अशी वेगवेगळ्या विभागात पदभरती करण्यात येणार आहे.
असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच २० ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. त्यानंतर शारीरिक टेस्ट होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Discussion about this post