जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय युवारंग या युवक महोत्सवास आज शनिवार दि.7 ऑक्टोबर रोजी शोभा यात्रेने प्रारंभ झाला. या शोभा यात्रेस विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील व के.सी.ई.सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. यावेळी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, ॲड. अमोल पाटील, डॉ.शिवाजी पाटील, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.सुरेखा पालवे, श्री.नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य सर्वश्री विष्णू भंगाळे, दीपक पाटील, नितीन ठाकूर, स्वप्नाली काळे, अमोल मराठे, डॉ.संदीप नेरकर, ऋषीकेश चित्तम, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, ॲङप्रवीणचंद्र जंगले, प्राचार्य ए.आर.राणे, प्राचार्य गौरी राणे, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, प्रा.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन आदी उपस्थित होते.
या महोत्सवासाठी मुळजी जेठा महाविद्यालयात तरूणाई दाखल झाली आहे. शनिवार दि.7 रोजी सकाळी 10 वाजेपासून संघाचे आगमन व नोंदणी या युवक महोत्सवात दुपार पर्यंत 100 महाविद्यालयांची नोंदणी झाली असून संध्याकाळी उशिरापर्यंत नोंदणी सुरू होती. 475विद्यार्थी, 714 विद्यार्थिंनी सहभागी होणार आहेत. या शिवाय पुरूष व महिला संघव्यवस्थापक, साथ संगत देण्यासाठी सहकारी व विद्यार्थी सहभागी असतील. विद्यार्थी-विद्यार्थिनी, संघव्यवस्थापक, संगीत साथीदार अशा 1595 नोंदणी करण्यात आली असून अनेक संघ दाखल झाले आहेत.
आजच्या शोभा यात्रेची सुरुवात मोठया उत्साहाने झाली असून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रसंगानुरुप निरनिराळया वेशभुषेत सहभाग घेतल्याचे दिसून आले. भारतीय संस्कृतीचे विविध पैलूंचे संस्कृतीचे दर्शन यावेळी बघावयास मिळाले. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतींचे दर्शन घडविले तसेच विविध विषय हाताळीत आपले सादरीकरण केले. यात नुकत्याच झालेल्या जी 20 परीषदेचा विषय हाताळतांना विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता, महिलांना संसदेत आरक्षण या विषयाचे सादरी करण करतांना महिलांविषयीचा आदर दिसून येत होता, शिवकालीन जागरण गोंधळ सादरीकरणात पारंपरिेक संगीत आणि अभिमानाने उर भरुन यावा असे अप्रतिम वेशभूषा करण्यात आली होती. तसेच गाणी सादर करतांना उत्साह ओसंडून वाहत होता. भारताच्या समृध्दीसाठी वारीतून पंचप्रण या विषयात देखील वेशभूषा सादर करुन भारताच्या समृध्दीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले, साने गुरुजींचे खरा तो एकचि धर्म हे प्रेरणादायी विचार आजच्या पिढीलाही प्रेंरणादायी कसे आहेत याची ग्वाही सादरीकरणात दिसून आली,
स्त्री पुरुष समानतेचा विषय व त्याची आजची गरज लक्षात घेऊन उत्तम सादरीकरण करण्यात आले, अन्न, वस्त्र व निवारा याच गोष्टीचा विचार होऊन मोबाईल नको तेच बालपण देगा देवा अशी भूमिका तरुणाईने मांडली, बेराजगारी निषेध, कानबाई उत्सवातून लोक परंपरेचे दर्शन, सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि स्त्री शिक्षणावर भर, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, मतदार राजा जागा हो, आदिवासी संस्कृतीचे दर्शन आदी विषयांचा सहभाग नोंदवतांना गीत व वाद्यवृंदासह नागरिकांना आकर्षित केले. ही शोभा यात्रा मुळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारापासून सुरु होऊन नुतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोप झाला.
Discussion about this post