मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी नेत्यांनी कंबर कसली असून मात्र त्यापूर्वीच नेते, आमदार किंवा कार्यकर्ते आपल्या पक्षाला राम राम ठोकून दुसर्या पक्षात प्रवेश करत आहेत.
अशातच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे पक्षातील पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटातील शिवसेना, युवासेना, सहकार क्षेत्र आणि शिवसहकार आदी आघाड्यांतील पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार निवडून आल्यानंतर पक्षाचा दर्यापूर विधानसभा क्षेत्रात मोठा बोलबाला झाला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. सांगलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून विराज नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
Discussion about this post