सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.
यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग वेट, वाइंडिंग इंजिनियर ड्रायव्हर, बॉयलर कम कंप्रेसर या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १०७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
पात्रता
मायनिंग वेट पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ३२ असावे. तर बॉयलर कम कंप्रेसर पदासाठी वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्याल आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
इतका पगार मिळेल?
मायनिंग मेट पदासाठी उमेदवारांना २९,१९० ते ४५,४८० रुपये पगार मिळणार आहे. वाइंडिंग इंजिन पदासाठी २८,७९० ते ४४,८५० रुपये पगार मिळणार आहे. बॉयलर कम कंप्रेसर पदासाठी २८,३९० ते ४४,२३० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरायचे आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही. जर तुम्हालाही चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.















Discussion about this post