मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदली करण्यात आलीय.
काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्यांच्या बदलीची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले. शुक्ला यांची तात्काळ प्रभावाने बदली करण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आदेल दिले आहेत. तसेच वरिष्ठ आयपीएल केडरच्या अधिकाऱ्यांची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले.
त्यांनतर रश्मी शुक्ला यांच्यानंतर सध्या विवेक फणासाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपण्यात आला आहे. मूळचे पुण्याचे असलेल्या विवेक फणसाळकर सध्या मुंबई पोलिस आयुक्त म्हणून काम पाहात आहेत.