मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात २१ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे.
ही दरवाढ 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅससंदर्भात करण्यात आली आहे. कर्मशियल गॅसमध्ये 21 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. आज 1 डिसेंबर 2023 रोजी देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडर 1796.50 रुपये तर गेल्या महिन्यात एलपीजी गॅसचे भाव 1775.50 रुपये प्रति सिलेंडर असा झाले
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये होता.
गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला 1 नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलेंडरचे दर 100 रुपयांनी वाढले होते. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या भावात वाढ करण्यात आली होती. सणासुदीच्या काळातच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. सध्या ग्राहकांना हॉटेलिंगसाठी जादा पैसा मोजावा लागत आहे.
व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम खाद्यउद्योगांवर दिसून येतो. हॉटेलिंग आणि फूड डिलिव्हरी महागली आहे. रेस्टॉरंटमध्ये पण खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी बाहेरील खाद्यपदार्थ महागले आहेत.
घरगुती सिलेंडरची किंमत
घरगुती सिलेंडरचे ग्राहक इतके नशीबवान नाहीत. गेल्या काही वर्षांपासून सिलेंडरचे भाव सातत्याने वाढत आहे. कधीकाळी 500 रुपयांच्या आत मिळणारे सिलेंडर आता एक हजारांच्या घरात मिळत आहे.















Discussion about this post