नंदुरबार । मध्य रेल्वेच्या नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक मनोरुग्ण तरुण थेट रेल्वेच्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरवर जाऊन चढला. यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळं भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णता विस्कळीत झाली होती. या घटनेमुळं लांब पल्ल्याच्या गाड्या स्टेशनवरच थांबवून ठेवल्या होत्या. त्यामुळं शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला
नंदुरबार रेल्वे स्थानकावर हा मनोरुग्न वीज प्रवाह करणाऱ्या एका विद्युत वाहिनीवर चढल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे. ही वीज पुरवठा वाहिनी बंद करण्यात आल्यामुळे, रेल्वे वाहतूक सेवेवर त्याचा दुष्परिणाम झाला असून, एक रेल्वे गेल्या एक तासापासून स्थानकावर उभी आहे.
मनोरुग्णाला वीज वाहिनीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मनोरुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हजारो प्रवासी हे स्थानकावर ताटकळले असून, काही रेल्वे या अर्ध्या रस्त्यातच थांबवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.















Discussion about this post