पाचोरा । गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील पुनगाव शिवारात घडलीय. विनापरवाना शस्त्र बाळगण्याची ही परिसरातील आठवड्यातील दुसरी घटना उघडकीस आल्याने परिसरात गुंडगिरी बोकाळत असल्याची सद्यस्थितीत परिस्थिती निर्माण होतांना दिसत आहे.
तालुक्यातील पुनगाव येथे एका इसमाजवळ गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले. पुनगाव शिवारातील महादेव मंदिराचे अलिकडे पोल्ट्री फार्मजवळ दोन इसम फिरत असल्याचे निदर्शनास येताच पथकाने सापळा रचत दोन्ही इसमांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.
याबाबत २० हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचे त्यावर काळे हॅण्डग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास ट्रिगर दबलेले व रिकामी तसेच विना स्प्रिंगची मॅगझिन तिची मागील पट्टी निघालेले असे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगल्याने राहुल अनिल परदेशी (वय २७) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (वय ३७) दोन्ही रा. पुनगाव ता. पाचोरा यांचेविरूद्ध भाग – ६ गु. र. नं. ३४७ / २०२३ भारतीय हत्यार कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.
Discussion about this post