मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतला जागावाटपाचा तिढा सुटला नाहीय. भाजपने उमेदवार जाहीर केले असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले नाहीय. त्यामुळे कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता लागली आहे. मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी आहे.
बुलडाणा लोकसभेसाठी आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना नाकारुन गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
उमेदवारांची नावं जाहीर झालेली नसताना संजय गायकवाड यांनी अर्ज का दाखल केला, असा प्रश्न उपस्थित होतोय. गायकवाड यांनी दोन अर्ज भरल्याची माहिती येतेय. एक अपक्ष आणि दुसरा पक्षाकडून. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.
संजय गायकवाड यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतता, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने शिंदेंसमोरची डोकेदुखी वाढणार आहे. बुलडाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना स्वपक्षातूनच हा मोठा धक्का समजला जातोय.
Discussion about this post