पुणे । सोसायटीमधील गाडी पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली. ही घटना पुण्यात घडली असून घडलेली संपूर्ण घटना सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,संपूर्ण परिसर एका सोसायटीचा दिसत आहे.जिथे सोसायटीमधील अनेक मजली कार पार्किंग परिसर दिसत आहे.काही वेळाने शांत दिसणाऱ्या या व्हिडिओत पार्किंगमधून एक कार अचानक भिंत फोडून जोरदार खाली कोसळली जाते. कारचा आवाज ऐकून अनेकजण तिथे जमा होतात.सध्या पुणे शहरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.
पुणे
पुण्यातील विमाननगर पतीसरातील थरारक घटनेचा cctv समोर
दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली
सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही
ही घटना विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता घातली आहे… pic.twitter.com/wEmCNK8Lxb
— Rahul Kulkarni (@RahulAsks) January 22, 2025
कारच्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या ‘saamtvnews’या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”गाडी पार्किंगमधून खाली कोसळली,व्हिडिओ आला समोर”असे लिहिण्यात आलेले आहे.
व्हायरल होत असलेल्या या अपघाताचे कारण रिव्हर्स घेताना अंदाज चुकलाचे सांगण्यात येत आहे,मात्र या घटनेवरुन वाहन चालवताना किती काळजी घेतली पाहिजे याचा अंदाज येईल.















Discussion about this post