बांगलादेशची राजधानी ढाका जवळ मोठी दुर्घटना घडली असून दोन ट्रेनची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
किशोरगंज मधील भैरब येथे दुपारी मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक बसून हा अपघात झाला. अपघातातील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात सुमारे 100 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये हा अपघात झाला. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, मदतकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, अनेक लोक ट्रेनखाली अडकले होते, तर अनेक जखमी डब्याखाली पडून होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.















Discussion about this post