मुंबई । लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती मंत्री आदिती तटकरे दिली असून, पुढील काही दिवसांत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाणार आहे.
मात्र त्याच वेळी ज्या लाभार्थ्यांनी अद्यात ई केवायसीची प्रक्रीया पूर्ण केली नाही, त्यांनी पुढील दोन महिन्यात ही प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारने ई केवायसी प्रक्रीय ऑनलाईन पध्दतीने सुरू केली आहे. यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या, आधार नंबर टाकल्यानंतर लाभार्थ्यांना ओटीपी जात नसल्याच्या तक्रारींचा प्रामुख्याने यात समावेश होता. पण आता त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही आदिती तटकरे यांनी नुकतेच केले होते.
दिवाळी पूर्वी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यानां सन्मान निधी देता यावा यासाठी प्रयत्न सुरु होते. नुकताच सामाजिक न्याय विभागाकडचा ४१० कोटींचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवण्यात आला होता. हा निधी प्राप्त होताच, तातडीने निधी वितरण सुरू करण्याचे निर्देश राज्यसरकारने महिला व बाल विकास विभागाला दिले होते. त्यामुळे शुक्रवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचे वितरण सुरु होणार आहे. त्यामुळे योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे.















Discussion about this post