जळगाव । जळगाव शहरातील दिनकर नगरात राहणाऱ्या हर्षल प्रदीप भावसार (वय-३१) या तरुणाचा जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर संशयास्पद मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडालीय. हर्षल याच्यासोबत घातपात झाला असून त्याला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचा आरोप त्याचे मामा मयूर भावसार यांनी केला. . याप्रकरणी प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेबाबत असे की, दिनकर नगरात वास्तव्याला असलेला हर्षल भावसार हा १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षल भावसार हा घराबाहेर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली. सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर मिळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. तरुणाच्या खिशात असलेल्या पाकीट व आधारकार्डवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली व संबंधितांना माहिती दिली. तरुणाचा मृतदेह बायपासनजीकच्या रेल्वे रुळाजवळ सापडला तर त्याची दुचाकी काशीबाई उखाजी कोल्हे शाळेनजीक आढळली. हर्षल याच्यासोबत घातपात झाला असून त्याला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचा आरोप त्याचे मामा मयूर भावसार यांनी केला. हर्षल व त्याच्या मित्रांनी रविवारी १६ नोव्हेंबर रोजी रात्री शनिपेठेत सोबत जेवण केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी काही वाद झाला व त्यानंतर हर्षलचा मृतदेह सापडला. या संदर्भात जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post